हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निकालाचे कल हाती आले असून त्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचं चित्रं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला आहे. बिहार निवडणुकीचे निकाल यायचे आहेत. काही कल मी पाहिले आहेत. त्यात तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतल्याचं चित्रं आहे. तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान दिलं आहे. बिहारमध्ये त्यांनी ताकद उभी केली असून सध्या तिथे कांटे की टक्कर सुरू आहे, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, बिहारमध्ये सर्वात वेगवान तेजस्वी. तेजस्वींच्या समोर पंतप्रधान, त्यांची फौज, केंद्रीय मंत्रिमंडळ, नितीश कुमार यांचं सरकार. सत्ता, संपत्ती, ताकद संपूर्ण होतं. पण एका मुलानं. एका तरुणानं ज्या पद्धतीनं सगळ्यांसमोर आव्हान उभं केलं. बिहारमध्ये ज्याप्रमाणे तो लढत आहे. मला वाटत हा एक चांगला संकेत आहे
बिहारमध्ये आता तेजस्वी पर्व सुरू होईल असं मानायला हरकत नाही, असं सांगतानाच भाजप आणि जेडीयूचा प्रचार केवळ बिहारच्या जंगलराज भोवती सुरू होता. पण 15 वर्षे बिहारमध्ये कोण सत्तेत होते? कुणाचं जंगलराज सुरू होतं? असा सवाल त्यांनी केला. निकाल आल्यानंतर लोक जंगल राज विसरून जातील आणि बिहारमध्ये मंगलराज सुरू होईल, असा चिमटाही त्यांनी काढला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’