हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताबद्दल झाल्यावर शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव शिंदेगटाला बहाल केल्याने शिवसेना म्हणून शिंदे गटाने सर्व 55 आमदारांना व्हीप जारी केला आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या 40 आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पातील काय रणनीती आखावी? यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व 40 आमदारांना अधिवेशना संदर्भात सूचना केल्या. यावेळी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावले. दोन आठवडे कोणीही व्हिप न बजावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही हा व्हिप बजावण्यात आला आहे.
दरम्यान, या व्हीपचा कुणी भंग केला तर त्यावर कारवाई होणार होणार नाही असे देखील गोगवले यांनी सांगितले आहे. शिवनसेनेला खिंडार पडल्यावर शिंदे गट यांनी उद्धव गट या दोन गटात शिवसेना विभागली गेली. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. शिंदे गटाकडे 40 आणि ठाकरे गटाकडे 15 असे शिवसेनेचे विधानसभेत 55 आमदार आहेत. व्हिप हा पक्षाचा आदेश असल्याने हा आदेश न पाळल्यास संबंधित आमदारांचे सभागृह सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जाऊ शकते.