शरद पवार – फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मात्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीबाबतची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये होणार ना महाराष्ट्रात

यावेळी बोलताना राऊत म्हणाले ‘फडणवीस माजी मुख्यमंत्री होते आणि विरोधी पक्ष नेते आहेत शरद पवार राज्यातील आणि देशातील मोठे नेते आहेत. ही सदिच्छा भेट होती. त्यामुळे राजकारण तापणार नाही. करोना संकटात विरोधी पक्षाने कशाप्रकारे भूमिका घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे, महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचे सहकार्य विरोधी पक्षाने करण्याची गरज आहे. यासंबंधी शरद पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केले असेल. असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी बोलताना ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये होणार ना महाराष्ट्रात असंही त्यांनी आवर्जून या वेळी सांगितले.

भेटीचा राजकीय अर्थ काढू नये

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले ‘महाराष्ट्रात आपली परंपरा आहे इतर राज्यांप्रमाणेच राजकारणात आपण शत्रुत्व घेऊन बसत नाही भेटीगाठी चर्चा होत असते त्यामुळे या भेटीकडे फार राजकीय हेतूने पाहाणं चुकीचा आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं. शरद पवारांनी सत्तेचा मंत्र दिला असेल का? असं विचारण्यात आले असता संजय राऊत यांनी सांगितलं की सत्तेचा मंत्र नक्की दिला असेल. ज्या प्रकारे विरोधी पक्ष राज्यात गोंधळ निर्माण करत आहे. सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत आहे हे सर्व असंच सुरू राहिलं तर पुढील शंभर वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही हे नक्की. शरद पवारांनी सांगितलं असेल पाच दिवसांपूर्वी मी देखील शरद पवारांना भेटलो होतो त्याच्या आधी वर्षा बंगल्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती असे सांगत संजय राऊत यांनी प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असं म्हटलं आहे.