हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत याना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले, बजेटचा फोकस शेतकऱ्यांवर पडणार का हे पाहावं लागेल. महाराष्ट्राला, मुंबईला, मुंबईच्या रेल्वेला काय मिळेल हे पाहावं लागेल. गरिबांना जास्त गरीब करु नये. मध्यमवर्गीयांना दिलासा मिळावा असं बजेट असावं.
जीएसटीचा परतावा काही हजार कोटीचा आहे, तो गेल्या अनेक महिन्यांपासून चेक पोहोचत आहेत, ते पोहोचू द्या. कोरोनाचं संकट, त्याबाबत काही दिलासा मिळतो का पाहावं लागेल.कोरोनाची लस मोफत देणार होता त्याची घोषणा करणार का? हे पाहावं लागेल
ते पुढे म्हणाले, या देशातील उद्योग जगताला, अर्थकारणाला उभारी द्यायची असेल तर उद्योगावर विशेष भार द्यावा लागेल. त्यांचा फास जो आवळताय तो ढिला करावा लागेल, त्यांना मुक्तपणे काम करु द्या असेही संजय राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’