गोव्यामध्ये काँग्रेस सोबतच्या आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले पण…; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोवा राज्यातील विधानसभेची निवडणूक लढविली जाणार आहे. या दरम्यान या ठिकाणी काँग्रेसही सोबत असणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज गोव्यातील निवडणूक लढवण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या धर्तीवर गोव्यात युतीचा नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, काँग्रेस सोबत नसणार असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आमच्यावतीने गोव्यामध्ये एकत्रित निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. काँग्रेसलाही सोबत घेण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. काँग्रेसच्यावतीने दिल्लीत तशा स्वरूपाचे संकेतही दिले असल्यामुळे एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसकडून मागेपुढे केले जात आहे. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.

यावेळी राऊत यांनी कोरोनाबाबतही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे पाहिले तर ते भयावह आहेत तर उत्तर प्रदेशात रुग्णांची नोंदच होत नाही. त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशात काय होईल हे सांगता येत नाही. अनेकदा निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलल्या जातात. पण कोणाला तरी घाई झाली आहे पटकन निवडणुका घेण्याची. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला.