चंद्रकांत पाटलांच्या डोक्याची चौकशी करा; पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर राऊत आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांच डोकं तपासण्याची वेळ आली आहे अशी टीका राऊतांनी केली.

संजय राऊत म्हणाले, काल मी पाहिले महाराष्ट्र भाजपचे एक नेते शरद पवारांचा उल्लेख अरे-तुरे, एकेरी भाषेत करीत होते, ही राज्याची परंपरा नाही, आम्ही मोदी साहेबांचा उल्लेख किंवा अमित शहा यांच्याविषयी कधी असे बोललो नाही. विचारांची लढाई विचारांनी लढावी आणि पराभव करावा हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवले. तुम्ही काल राजकारणात आलेली लोक शरद पवार यांचा उल्लेख एकेरी करता. म्हणून मी म्हणतो, यांची डोकी ठिकाणावर आहेत का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं

Leave a Comment