महाराष्ट्र देशाचे पोट भरतो, पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होतोय ; अर्थसंकल्पावर राऊतांची नाराजी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र देशाचे पोट भरतो. महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र देशाचं पोट भरतो पण राज्याकडं कोण पाहत नाही. हा अर्थसंकल्प देशाचा आहे की एखाद्या पक्षाचा आहे? असा सवाल करत हा देशाचा अर्थसंकल्प नसून तो एका राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
अर्थसंकल्प देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणारा – नारायण राणे
अर्थसंकल्प देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणारा आहे. हा अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, असं भाजप खासदार नारायण राणे म्हणाले. देशाला आर्थिक विकासाकडे घेऊन जाणारा हा समतोल आणि देशाला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे, असंही त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’