Union Budget 2021 चा सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढलाय

मुंबई | आज केद्रीय अर्थसंकल्प 2021 लोकसभेत सादर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात LIC, IDBI सह अनेक सरकारी संस्थांचे खाजगीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. यावरुन आता केंद्र सरकारवर टिकेची झोड उठली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचा सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढलाय असं मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

“या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ…देश विकायला काढलायं” अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यावेळी #India_For_Sale असा हॅशटॅग आव्हाड यांनी वापरला आहे.

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करणाऱ्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असं स्पष्ट केलं आहे. याचप्रमाणे आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्यासंदर्भातील घोषणाही निर्मला यांनी केली. दोन बँका आणि एक आयुर्विमा कंपनीमधील निर्गुंतवणूक सरकारकडून केली जाणार आहे. एलआयसीचा आयपीओ यंदा बाजारात येणार असल्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे.

You might also like