… तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचा भाजपला इशारा

0
193
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर राऊत प्रथमच मुंबईत आले यावेळी शिवसैनिकांनी ढोल ताशा वाजवत राऊतांचं स्वागत केलं. शिवसेना कार्यकर्त्यांकडून मुंबई विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, काहीही झालं तरी पुढील 25 वर्ष महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, आम्हीही तुम्हाला उद्ध्वस्त करू असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली.

तपास यंत्रणा मार्फत भाजपकडून आमच्यावर हल्ले सुरू आहेत. पण महाविकास आघाडी एकत्र आहे. आम्ही कुठल्याही संकटाला एकजुटीनं सामोरे जावू. राजकीय विरोधक विचारानं सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असं संजय राऊत म्हणाले. भाजप स्वतःसाठी कबर खोदून घेत आहे. पुढची 25 वर्ष महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही. असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या शक्ती प्रदर्शनावरून भाजप नेत्यांनी टीका केली आहे. गुंड गजा मारणे जेलमधून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक निघाली होती. मग त्याला स्वागत म्हणायचं का? त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे पटणारं नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली तर दुसरीकडे अतुल भातखळकर यांनीही राऊतांवर तोफ डागली. गलिच्छ भाषा वापरणारे संजय राऊत त्यांचं असे स्वागत होणे म्हणजे हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे असे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हंटल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here