हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामनातून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आजच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे तो म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या नावाने सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. शिवसेनेच्या नावावर उनलेले मातलेले मंबाजी , त्या मंबाजी मंडळाचे ‘खोके’ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल असे सामनातून म्हंटल आहे.
शिवसेनाप्रमुख अर्थात एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख आज 97 वर्षांचे झाले असते. 55 वर्षे त्यांनी महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी झिजवली. अर्थात अशा विभूतीये कार्य वयाने मोजायचे नसते आणि शिवसेनाप्रमुख क्याने कधीच म्हातारे झाले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या नंतरही त्यांनी उभे केलेले, वाढवलेले, रुजवलेले ‘शिवसेना’ नावाचे अग्निकुंड आजही धगधगताना दिसत आहे. आत्मविश्वासाचे बळ असेल तर जगात तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही, हा शिवसेनाप्रमुखांचा मंत्र प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात मशालीसारखा पेटता आहे. ही मशाल गेल्या पंचावन्न वर्षात कुणालाच विझवता आली नाही. सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकानी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते असं शिवसेनेने म्हंटल.
शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशांचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत. अर्थात कुणी मंदिरातील मूर्ती चोरली तरी त्या चोरलेल्या मूर्तीचे मंदिर होऊ शकत नाही, ते श्रद्धास्थान ठरू शकत नाही. चोर मंदिरात घुसतात, चोरी करतात ती मूर्ती चोरून विकण्यासाठीच. महाराष्ट्रात नेमके तेच झाले आहे.
मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण आपला बाप व पाठीराखा दुसराच कोणी असल्याचा दावा त्यांनी परदेशात केला. पुन्हा मोदीसमोर गुडघे टेकून सांगितले, “आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. वाघांच्या झुंडीत शिरलेली आम्ही मेदर आणि कोल्हे होतो. आम्ही वाघाचे कातडे पांघरून तेथे होतो, पण ईडी वगैरे लोकांनी आमचे कातडे ओढून काढले. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेचा” अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला, बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओड़के आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरामखोरांची राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली! असं म्हणत सामनातून मुख्यमंत्री शिंदेसह भाजपवर निशाणा साधला.