पंढरपूर | भाजपच्या एका खासदाराने हनुमान चीनी होता असे म्हटले होते तर एका नेत्याने हनुमान मुस्लिम होता असे म्हटले होते. यामुळे भाजप चांगलेच वादात सापडले होते. यापार्श्वभुमीवर ‘भाजपाच्या वाचाळवीरांचे तोंड बंद करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बांबूचा कारखाना काढावा’ असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपाच्या काही नेत्यांनी कमी बोलण्याची गरज आहे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रया दिली आहे. ‘गडकरी म्हणतात तसे खरंच करायचे असेल तर पंतप्रधानांना बांबूचा कारखानाच काढावा लागेल’ असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच ‘भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून तालुका आणि गावपातळीवरचे नेते पक्ष चर्चेत राहावा म्हणून शिवसेनेसोबत युतीची विधाने करत असतात’ असा टोमणाही राऊत यांनी यावेळी मारला आहे.
दरम्यान भाजdपाने आता राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य करणे थांबवावे, असा उपरोधिक सल्ला संजय राऊत यांनी मित्रपक्ष भाजपला दिला आहे.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
मोदींनी देशात आणीबाणी घोषित करावी – शिवसेना
मुंबईतील या प्रमुख स्थानकांची नावे बदलणार, शिवसेनेचा प्रस्ताव