मुंबई प्रतिनिधी | भाजप शिवसेनेची युती झाली असली तरी शिवसेना आणि भाजपमध्ये तसे फारसे आलबेल नसल्याचे चित्र सध्या दिसते आहे. निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच भाजप शिवसेना नवा मुख्यमंत्री कोण होणार. तो आमचाच होणार या चर्चेत व्यस्थ झाली आहे. अशातच रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या एका वक्तव्याचा आज सामन्याच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे एका पत्रकार परिषदेत वक्तव्य केले होते कि कोण म्हणत भाजपचा मुख्यमंत्री नाय होणार. मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार आहे. भाजपला आता निवडणुकीच्या तयारीला लागण्याची आवश्यकता नाही. कारण भाजप सेनेचे सरकार हे सत्तेवर येणार आहे असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्याचाच आज सामन्याच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे.
भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बातचीतीतून हे स्पष्ट झाले आहे कि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. त्यामुळे नेत्यांनी यावर चर्चा करण्यात वेळ घालवू नये. तसेच हि चर्चा गुप्त असल्याने आत्ताच सार्वजनिक करता येणार नाही. त्यामुळे आम्ही दाव्याने सांगतो महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आहे असा आहेरच शिवसेनेने रावसाहेब दानवे यांना दिला आहे.