राष्ट्रवादीकडील गृहखाते शिवसेनेला हवंय?? भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने शिवसेना नाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये धुसपूस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्यावर शिवसेना नाराज असून आता स्वतःकडे गृहखाते असावे अशी शिवसेनेची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर एकामागून एक ईडी कारवाई होत असताना गृहखात्याने मात्र आक्रमक भूमिका घेतली नाही असे शिवसेनेचे म्हणणं आहे. भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याने शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले गृहखाते हवं आहे अशी माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात ईडी ने फास आवळला आहे. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हेवणे पाटणकर हे सुद्धा ईडी च्या रडारावर आहेत. अशा परिस्थितीत गृह खात्याकडून आक्रमकपणे भाजपवर प्रतिहल्ला झाला नाही त्यामुळे शिवसेना भाजपवर नाराज असल्याचे समजत आहे.

तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसत आहेत हे गृहखात्यावरील आक्रमण आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, तपास यंत्रणा ज्यांच्या अख्त्यारित आहे त्यांनी यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आहिस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत,” असंही संजय राऊत म्हणाले. “गृहखात्याला दमदार पावलं टाकावी लागतील अन्यथा रोज तुमच्यासाठी रोज एक नवा खड्डा खणाल,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.

Leave a Comment