महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा!! सामनातून थेट इशारा

thyackeray shinde fadnvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी कडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा होणारा अवमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या कारणांमुळे महाविकास आघाडी कडून मोर्चा पुकारण्यात आला आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. तत्पूर्वीच शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून विरोधकांवर इशारा दिला आहे. मोर्चात आडवे याल तर याद राखा असं सामनातून म्हंटल आहे.

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर बसवले गेले आहे. हे सरकार म्हणजे महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे आहेत. हे चिडवडे रोखण्यासाठीच तमाम महाराष्ट्रप्रेमींचा एक अति विराट मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे. या मोर्चामुळे फडणवीस शिंदे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचे हातपाय लटपटू लागले आहेत. म्हणूनच महाराष्ट्रप्रेमींचा महामोर्चा निनूच नये यासाठी परवानगी नाकारण्यापासून ते अटी-शर्ती लादून अडथळे निर्माण करण्यापर्यंत या लोकांचे रडीचे डाव सुरू आहेत. तरीही अडथळे ठोकरून महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा निघणार म्हणजे निघणारच असं शिवसेनेने म्हंटल.

महाराष्ट्रातील चार लाख कोटींचे उद्योग दिल्लीतील महाशक्तीने गुजरातमध्ये पळवून नेले. दोन लाख मराठी तरुणांचा रोजगार त्यामुळे बुडाला. महाराष्ट्र ओरबाडून काढण्याचे काम बिनबोभाट सुरू असताना राज्याचे सरकार लाचाराप्रमाणे गप्प बसले आहे. . राज्यपाल पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या राजभवनात बसून छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेचा अपमान करते व मिथे सरकार त्या अपमानाचे समर्थन करते. शिवरायांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्राची मर्द जनता पेटून उठली असताना त्या जनतेस गप्प बसवण्यासाठी दडपशाहीचा मार्ग अवलंबला जातोय. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा महान देवतांचा अपमान होत असताना महाठी जनता गप्प बसेल काय? असा सवाल शिवसेनेने केला.

बाजूच्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी तर महाराष्ट्राच्या मिचे सरकारची साफ शेळी-मेंढीच करून टाकली आहे. बेळगावसह सीमा भागाचा वाद सर्वोच्च न्यायालयात असताना या महाशयांनी आपल्या सांगली-सोलापूरवरच दावा सांगितला. बेळगावातील मन्हाठी जनतेवर अन्यायाचा नवा वरवंटा फिरवला. वातावरण तप्त झाले तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून फक्त 15 मिनिटे चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमा भागातील परिस्थिती जैसे थे’ ठेवायची असे ठरले त्याने काय घडणार?

काही झाले तरी कर्नाटकचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार. कारण महाराष्ट्रात एक वाकया शेपटीचे बेकायदा सरकार सत्तेवर बसले आहे व ते दिल्लीचे गुलाम आहे. महाराष्ट्राच्या जनतेलाही दिल्लीचे गुलाम बनविण्याचा त्यांचा इरादा आहे. महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी त्यांना खोकेच अर्पण करायचे आहेत. त्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा दैवतांचे अपमान सहन केले जात आहेत, पण महाराष्ट्राची जनता अपमान सहन करणार नाही. ती वाघाच्या छातीने आणि सिंहाच्या हिंमतीने महामोर्चात सामील होईल. महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा! असा इशारा सामनातून देण्यात आला.