भविष्यात भाजप- शिवसेना एकत्र येणार नाहीच- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काहीही झालं तरी भविष्यात शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत अस मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत हे सध्या नागपूर दौऱ्यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले

संजय राऊत म्हणाले, एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं दोन्ही पक्षांनी 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे भविष्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येणं शक्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेची आगामी वाटचाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.

दरम्यान, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आम्ही राजीनामा का घ्यावा? तुम्ही चुकीच्या आरोपांवर आमच्या मंत्र्यांना फसवत आहात. अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती. तेव्हा देशमुखांचा राजीनामा नव्हता घ्ययाला पाहिजे. तो निर्णय घाईघाईनं झाला असं मला वाटतं. असेही संजय राऊत यांनी म्हंटल.

Leave a Comment