औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाल्याने त्या जागी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या ताब्यात असणारी जागा आपल्या नावे करून घेण्यास यश मिळवले असून शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी काँग्रेस आघाडीच्या बाबुराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला आहे.
या निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य मतदान करणात. महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेचे लोकनिर्वाचित सदस्यांमधून या आमदाराची निवड विधान परिषदेवर केली जाते. त्या आमदाराचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. तसेच तो स्वमर्जीने कधीही राजीनामा देऊ शकतो. औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजप शिवसेनेकडे ३३०, काँग्रेस राष्ट्रवादीकडे २५० तर एमआयएम आणि अपक्ष यांची ७७ अशी एकूण ६५७ मते होती.
१९ ऑगस्ट रोजी औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद जागेसाठी मतदान पार पडले. आज सकाळी या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेना भाजप यांच्या मतांचा झालेल्या मतदानाचा आकडा ३३० असताना अंबादास दानवे यांना ५२४ मते कशी मिळाली याचीच चर्चा औरंगाबाद मध्ये रंगताना दिसत आहे. याचा एक अर्थ असा की एमआयएमच्या नगरसेवकांनी देखील अंबादास दानवे यांना मतदान केल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.