हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाची तपासणी करण्याच्या बहाण्याने एका ३६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. रतनगड शासकीय रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात महिलेने गुरुवारी रतनगड पोलिस ठाण्यात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हावडा येथील रहिवासी असलेली ही महिला आपल्या सासरी डीडवाना येथे पायीच चालत जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाटेत ती एका ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने रतनगडला पोहोचली, पण त्या भागात हावडा येथे जाण्याचे कोणतेही साधन तिला सापडले नाही, त्यानंतर ती स्टेशन रोडवरील रेन बसेराजवळ आली जिथे काही साधूंनी तिला जेवण देखील दिले.
कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली सामूहिक बलात्कार
यादरम्यान, मुश्ताक आणि त्रिलोक तिच्याकडे आले आणि रुग्णालयाच्या आवारात असलेल्या दुधाच्या डेअरीमागे तिला झोपण्यास जागा दिली. त्यानंतर २० मे च्या दिवशी सकाळी ते दोघे पुन्हा तिथे आले आणि म्हणाले की,’ तुझी कोरोनाची टेस्ट करावी लागेल. त्यांनी मग तिला त्या रुग्णालयाच्या शौचालयामागे असलेल्या एका जागेत नेले जिथे या दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्येच बांधलेल्या सुलभ कॉम्प्लेक्समध्ये महिलेला स्नान करण्यास आणले गेले, तेव्हा त्या संकुलात काम करणाऱ्या कर्मचार्याने देखील तिच्याबरोबर अश्लील कृत्य केले.
या घटनेनंतर रतनगड येथील विजय नायक नावाचा एक युवक या महिलेला भेटला जो तिला पोलिस ठाण्यात घेऊन आला. येथे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. डीएसपी प्यारेलाल मीणा यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत
डीएसपी प्यारेलाल मीणा यांनी सांगितले की, ‘ही महिला पश्चिम बंगालची रहिवासी आहे. तिचे सासरे हे डीडवानामध्ये आहे. ती पश्चिम बंगालला जात होती आणि पायीच येथे आली. रेल्वे स्टेशनवर, तिला २ किंवा ३ मुले भेटली ज्यांनी तिला कोरोना स्क्रिनिंग करण्यास सांगितले. ते त्या महिलेला तपासणीच्या बहाण्याने शौचालयाजवळील झुडुपाजवळ घेऊन गेले. या महिलेने सांगितले की ‘दोन मुलांनी माझ्यावर बलात्कार केला आणि एकाने छेडछाड केली. यामुळे तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे ज्यानंतर सर्व काही समोर येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.