‘सावरकर इंग्रजांची माफी मागून महिन्याला 60 रुपये…’; नाना पटोलेंचं धक्कादायक विधान

nana patole
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रा करत आहे. हि यात्रा सध्या महाराष्ट्रात येऊन दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याविषयी एक धक्कादायक विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक विधान करून नवीन वादाला तोंड फोडले आहे.

काय म्हणाले नाना पटोले?
भगवान बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या प्रलोभनांना बळी पडले नाहीत. उलट सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांनी इंग्रजांना पत्रव्यवहार करून माफी मागितली होती, असं पटोले म्हणाले. तसेच सावरकर हे इंग्रजांकडून महिन्याला 60 रुपये पेन्शनदेखील घेत होते. सावरकरांना अपमानित करणारा विचार जमिनीत गाडणार, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी हे विधान केले.

काय म्हणाले होते राहुल गांधी ?
राहुल गांधींनीदेखील सावरकरांबाबत मोठे विधान केले होते. ‘सावरकर (Swatantra Veer Savarkar) खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. एकीकडे देशासाठी अवघ्या 24 व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली’, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) हे देशातील असे एक नेते आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला. आजही काँग्रेसकडून त्यांचा विचार कारावासात टाकायचं काम सुरु आहे. त्यांना राज्यातील जनताच उत्तर देईल. त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘स’ माहिती नाही. ते किती वर्षे तुरुंगात होते ते ही त्यांना माहिती नाही,” असा टोलादेखील फडणवीस यांनी यावेळी लगावला.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती