Live In Relationship जीवावर बेतली!! श्रद्धा वालकर, निक्की यादव आणि मेघा थोरवी; निर्घृण हत्येने झाला प्रेमाचा शेवट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रध्दा वालकर खून प्रकरणानंतर काही महिन्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातून अशाच प्रकारच्या २ हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. निकी यादव आणि मेघा थोरवी असं सदर मृत पीडित मुलींची नाव आहेत. या तिन्ही हत्येमधील समान गोष्ट म्हणजे तिन्ही मुलींची हत्या त्यांच्या प्रियकराने केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी, निक्की यादव आणि मेघा थोरवी यांच्या हत्येची धक्कादायक माहिती उघडकीस आली. चला आज आपण तिन्ही घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊया ….

निक्की यादव हत्या प्रकरण –

हरियाणातील झज्जर येथील २५ वर्षीय निक्की यादवची निर्घृण हत्या तिचा लिव्ह इन रिलेशन मधील पार्टनर साहिल गेहलोत याने केली. त्याने डेटा केबलचा वापर करून निक्की यादवची हत्या केली आणि तिचा मृतदेह दिल्लीतील नजफगढच्या सीमेवर असलेल्या त्याच्या ढाब्यावर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला आणि गुन्ह्याच्या त्याच दिवशी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. ही घटना 9 आणि 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. निक्की आणि साहिल गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि निक्कीला साहिलसोबत लग्न करायचे होते. मात्र आरोपीला दुसऱ्याच एका मुलीशी लग्न करायचं होत. जेव्हा निक्कीला या सर्व प्रकाराबाबत समजलं तेव्हा साहिल आणि तिच्यात वाद झाला आणि या भांडणातूनच साहिलने निक्कीची निर्घृणपणे हत्या केली.

मेघा थोरवी खून प्रकरण-

निक्की यादवच्या खून प्रकरणादरम्यानच, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली . 37 वर्षीय मेघा थोरवी हिची हत्या तिचाच लिव्ह इन पार्टनर असलेल्या हार्दिक शहा याने केली. मेघा थोरवी आणि हार्दिक शहा हे तुळींज परिसरात भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. मेघा ही एक नर्स होती. घरचा सगळा खर्च तीच करत होती तर हार्दिक मात्र बेरोजगार होता. हार्दिकच्या बेरोजगारीवरून दोघांमध्ये भांडण होत होते आणि त्यातच त्याने मेघाची हत्या केली. ही घटना रविवारी (12 फेब्रुवारी) घडली.

श्रद्धा वालकर हत्याकांड-

18 मे 2022 रोजी, 28 वर्षीय आफताब अमीन पूनावाला याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची निर्घृणपणे हत्या करत तिच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आफताब सध्या तुरुंगात आहे. याप्रकरणी त्याच्यावर 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून यामध्ये त्याने श्रद्धाची हत्या कशी केली, तिचे तुकडे कसे केले, फ्रिजमध्ये कसे ठेवले आणि मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, आफताब आणि श्रद्धा डेटिंग अॅप प्लॅटफॉर्मवर भेटले आणि ते 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होते. मे 2022 मध्ये, या दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात आफताबने तिचा गळा दाबून खून केला. आफताब एवढ्यावरच थांबला नाही तर ताईने त्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले.