रेल्वे स्टेशनवरचा कुली झाला जिल्हाधिकारी; श्रीनाथनंने फ्री Wi-Fi वर अभ्यास करत दिली UPSC परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज येणाऱ्या प्रवाशांच्या बॅग, साहित्य उचलून थकलेल्या एका कुलीनं आपणही अभ्यास करून अधिकारी व्हावं असं मनाशी ठरवलं. आणि मग सुरु झाला त्याचा अधिकारी होण्याचा प्रवास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तो बॅग उचलत दिवसभर काम करायचा आणि वेळ मिळेल तसा रात्रीच्यावेळी तो स्टेशनवर असलेल्या फ्री व्हायफाय वर अभ्यास करायचा. पुढे होऊन त्याने UPSC परीक्षा आली आणि आज तो हमाल जिल्हाधिकारीपदावर रुजू झाला आहे. हि यशोगाथा आहे मुन्नार येथील श्रीनाथनंची…

Shrinath K

रेल्वे स्टेशनवर केली हमाली

मुन्नार येथील रहिवासी असलेल्या श्रीनाथनंने सुरुवातीला आपल्या मित्रांबरोबर रेल्वे स्टेशनवर कुली अर्थात हमालाची नोकरी पकडली. दिवसभर काम करून तो जेमतेम पैसे कमवायचा. त्यातून आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. जवळ पैसे नसल्याने पुस्तक घेऊ न शकलेला हा युवक रेल्वे स्टेशनवरील फ्री वाय-फायच्या मदतीने अभ्यास करून KPSC आणि KAS परीक्षा उत्तीर्ण झाला. आपल्याला सरकारी नोकरीच करायची आहे हे स्वप्न त्याने अत्यंत मेहनतीने पूर्ण केले आहे.

Shrinath K 01

फ्री Wi Fi च्या मदतीने केला अभ्यास

केरळ येथील हमाली करणाऱ्या तरुणाने केरळ लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण होण्यात तसेच IAS होवून स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. श्रीनाथ के. याने रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करताना तेथे उपलब्ध असलेल्या फ्री Wi Fi च्या मदतीने सरकारी परिक्षेत त्याने यश मिळवले. स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी चांगल्या आयुष्याची आकांक्षा बाळगून श्रीनाथने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य करुन दाखवला.

Shrinath K

असा घेतला निर्णय

श्रीनाथ के. हा रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करत होता. घरच्या बिकट परिस्थितीची झळ तीव्र होत होती. त्यावेळी त्याच्या पदरात एक वर्षाची मुलगी होती. मुलीचं भविष्य चांगलं असावं या विचारानं त्याने अजून काही चांगल्या गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी 2018 मध्ये त्याने सरकारी परीक्षा देवून अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

Shrinath K

अशा प्रकारे केला अभ्यास

काम आणि जबाबदारीमुळे श्रीनाथला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. 2016 मध्ये Airtel आणि Google ने भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे श्रीनाथला काम करताना अभ्यास करणं सोपं झालं. UPSC अभ्यासासंदर्भात Audiobook आणि व्हिडिओ डाउनलोड करून त्याने रेल्वे स्टेशनवर काम करत करत केपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

Google India

Google India कडून दखल

श्रीनाथने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशातून मेमरी कार्ड, स्मार्टफोन आणि ईयरफोन खरेदी केले. तयारी पूर्ण झाल्यावर त्याने ग्राम सहाय्यक पदासाठी केरळ लोकसेवा परीक्षेसाठी अर्ज भरला. या परीक्षेत त्याला 82 टक्के गुण मिळाले. श्रीनाथनची संपूर्ण कहाणी गुगल इंडियाने शेअर केली तेव्हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी 2018 मध्ये त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक केले. त्यानंतर श्रीनाथने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली आणि यूपीएससी सीएसईमध्ये तो चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाला. यानंतर तो आयएएस अधिकारी बनला.