सोनू निगमला ठाकरे गटाच्या आमदार पुत्राने केली मारहाण; मुंबईत कॉन्सर्टवेळी घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबुरमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना मारहाण झाल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला आहे. सेल्फी घेण्यावरून वादातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने मारहाण केल्याचा आरोप करत सोनू निगमने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.

चेंबूर फेस्टिव्हलमध्ये गायक सोनू निगम हा परफॉर्म करत होता. यावेळी आमदाराच्या मुलाने सोनू निगम व व्यवस्थापक सायरा यांच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना आधी सोनू निगमच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. त्यानंतर सोनू निगमलासुद्धा धक्का दिला. या प्रकरणी सोनू निगम याने स्वप्निल फातर्पेकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

हल्ल्याची घटना घडल्यानंतर सोनू निगमने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने म्हटलं की, कॉन्सर्टनंतर स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने मला पकडलं आणि त्याने हिर आणि रब्बानी यांना धक्का दिला. ते दोघेही मला वाचवण्यासाठी आले होते. मी पायऱ्यांवर पडलो. मी याची तक्रार दाखल केली आहे. लोकांनी जबरदस्तीने सेल्फी आणि धक्काबुक्की पुन्हा करू नये यासाठी मी तक्रार केली आहे. जर काही लोखंडाच्या सळ्या असत्या तर रब्बानीचा मृत्यू झाला असता अशा पद्धतीने त्याला धक्का दिला होता.

व्हिडीओ social media वर व्हायरल

सोनू निगम याला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत स्पष्ट काहीच दिसत नाही. पण ट्वीटर युजर समित ठक्कर याने एक व्हिडीओ ट्वीट केला होता. यात त्यानं दावा केला होता की, उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि त्यांच्या मुलासह कार्यकर्त्यांनी सोनू निगमला धक्काबुक्की केली. काल सोनू निमगला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.