SIP Investment Tips : सध्याच्या महागाईच्या काळात भविष्यात आपल्याला आर्थिक अडचण भासू नये म्हणून आत्तापासूनच आपण पैशाची ठिकठिकाणी गुंतवणूक करत असतो. कारण म्हातारपणी हाच पैसा आपल्या कामी येणार असतो. गुंतवणुकीसाठी आपण बँक FD, पोस्ट ऑफिस, LIC योजना, सोने खरेदी यांसारख्या अनेक पर्यायांचा वापर करतो. आजकाल शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढलं आहे. म्युचुअल फंड गुंतवणुकीतील असाच एक पर्याय म्हणजे SIP, ज्याला आपण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतो. म्हणजेच महिन्याला ठरविक रक्कमेची गुंतवणूक करून काही वर्षांनी भला मोठा फंड जमा करणे होय. परंतु SIP मध्ये पैसे गुंतवत असताना काही गोष्टींची खबरदारी बाळगणे आवश्यक असते. चला, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….
SIP म्हणजे काय?
एसआयपी ही एक प्रकारची गुंतवणूक आहे ज्यामुळे तुम्ही पैशाची बचत सुद्धा करू शकता आणि त्याबदलत्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात रिटर्न सुद्धा मिळू शकतो. शेअर मार्केट मधील एकूण परिस्थितीनुसार तुम्हाला SIP मध्ये रिटर्न मिळतो. शक्यतो बँक आणि पोस्ट ऑफिस मध्ये एसआयपी मधील गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता असते. तुम्ही दर महिन्याला अगदी 500 रुपयांची गुंतवणूक करून एसआयपी करू शकता.ही योजना सोयीची असली तरी फ्लेक्सिबल मानली जाते. तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या रकमेची गुंतवणूक करू शकत असल्याने गुंतवणूक करणं सोप्प आणि सर्वसामान्यांना परवडणारी आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याला गुंतवणूक (SIP Investment Tips) करण्यासाठी रक्कम निवडू शकता. त्यानंतर दर महिन्याला तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जातात.
या गोष्टी लक्षात ठेवा – SIP Investment Tips
कोणतीही गोष्ट करत असताना त्यातून होणारे फायदे आणि तोटे दोन्हीचाही अंदाज घेणं आवश्यक आहे. एसआयपी मध्ये गुंतवणूक (SIP Investment Tips) करत असताना तुम्ही नक्की कशासाठी गुंतवणूक करत आहात हे तुमच्या मनात स्पष्ट असलं पाहिजे. तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी पैसे साठवत आहात? कि स्वतः निवृत्त झाल्यास वापरण्यासाठी? कि नवीन घर खरेदी करण्यासाठी हे आधी नक्की करा. कारण यामुळे गुंतवणूक कालावधी नेमका किती असावा हे निवडण्यासाठी तुम्हाला मदत होईल.
एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, सदर म्युच्युअल फंडाची मागील कामगिरी, फंड व्यवस्थापक तज्ञांचा सल्ला, खर्च आणि आर्थिक गणित जाणून घ्या. तुम्ही किती रुपयांपर्यंत दर महिन्याला पैशाची गुंतवणूक करू शकता याचा अंदाज घ्या. आणि मगच पैसे गुंतवा.