जालना : हॅलो महाराष्ट्र – चोरटयांनी जालना शहरातील अंबड रोडवर असलेले फ्लीपकार्ड ऑनलाइन कुरियर पार्सलचे कार्यालय फोडले. हे कार्यालय फोडून चोरटयांनी 5 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही संपूर्ण चोरीची (Theft) घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. मध्यरात्री झालेल्या या चोरीमुळे (Theft) परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालन्यात फ्लिपकार्डचे कार्यालय फोडून 6 लाखाचा मुद्देमाल केला लंपास, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/zIURp8ALlF
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 7, 2022
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु
सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे फ्लीपकार्ड कुरियर पार्सलच्या कार्यालयाचे शटर तोडून आत घुसले. कार्यालयात या चोरट्यांनी प्रवेश करून या कार्यालयातील कुरियर पार्सलचे बॉक्स खोलले. या बॉक्समध्ये असलेला सर्व किंमती मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. हा मुद्देमाल 5 लाख 87 हजार रुपयाचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कर्मचारी ऑफिसला आले तेव्हा हि चोरीची (Theft) घटना उघडकीस आली.
याप्रकरणी कार्यालय मालकाने जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा (Theft) शोध घेत आहेत.
हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर
रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी
दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू
अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर
वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान