सातारा तालुक्यातील गोजेगावमधील साठ एकर ऊसाला आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील धारकरा शिवारात अज्ञातांनी सुमारे साठ एकर उसाला आग लावल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे 100 हुन अधिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सातारा तालुक्यातील गोजेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुमारे साथ एकर क्षेत्रात उसाची लागण केली आहे. दरम्यान आज अचानक गोजेगाव परिसरातील धारका नावाच्या शिवारात अज्ञात व्यक्तींनी आग लावण्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून यामध्ये सुमारे साथ एकर ऊस जळून खाक झाला आहे. तर शंभरहून अधिक शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सध्या वीज वितरण कंपनीचा संप असल्यामुळे या भागात कालपासून विद्युत पुरवठा देखील बंद असल्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवला आहे. हा सर्व ऊस अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या अखत्यारीत येत असून या उसाबाबत आमदार शिवेंद्रराजे यांनी जळालेल्या ऊसात कोणतीही कपात न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Leave a Comment