पुणे : हॅलो महाराष्ट्र – वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीने पुण्यात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा घालत घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. या राड्यादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बालगंधर्व मंदिर सभागृहात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम ठरलेला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या घुसल्या आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यानंतर दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत राष्ट्रवादींच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या महिला कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना हि धक्काबुक्की करण्यात आली.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर उचलला हात, स्मृती इराणींच्या कार्यक्रमात जोरदार राडा pic.twitter.com/t5yPSW405r
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 16, 2022
यादरम्यान भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला. पोलीस राष्ट्रवादीच्या महिलांना घेऊन जात असताना त्याने हि चापट मारली. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याआधी स्मृती इराणी (Smriti Irani) जे मेरेटियल हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमधून कार्यक्रमस्थळी निघाल्या असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. स्मृती इराणी यांना बाहेर येता आले नव्हते. यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्या बालगंधर्व कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.
हे पण वाचा :
मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य
राज्यसभा निवडणूकीची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान
PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन
KTM प्रेमींना झटका!! DUKE बाईक महागली
Bollywood : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला केला गुड बाय !!!