हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आई वडिलांना आपल्या मुलाचे नाव ठेवताना सगळ्या प्रकारे सर्वोत्तम असायला हवे असे वाटत असते. अनेक वेळा आई वडील आपल्या मुलाचे नाव हे मिनिंगफ़ुल्ल असायला हवे .यासाठी अनेक आईवडील प्रयत्न करत असतात. परंतु एका आईने आपल्या मुलाचे नाव चक्क स्काय ठेवले आहे. कारणही तसेच आहे.
काही दिवसांपूर्वी एका महिलेने गरोदर पणात असताना तिने विमानाने प्रवास करत असते. त्या वेळी अचानक तिला त्रास व्हायला सुरवात झाली आणि तिने बाळाला जन्म दिला. या बाळाने आकाशात जन्म घेतल्याने त्या बाळाचे नाव स्काय ठेवले आहे. क्रिस्टल हिल्स असे या महिलेचे नाव आहे. ती विमानाने अलास्का या ठिकाणी प्रवासासाठी निघली होती त्यावेळी तिने महिने पूर्ण न होता त्या बाळाला जन्म दिला आहे. जन्मानंतर त्या बाळाला सुरक्षेत रित्या अलास्का येथील रुग्णालयात आणले होते.
बाळाला जन्मानंतर ब्रिथिंग मशीनवर ठेवण्यात आले होते. कारण बाळ हे काही दिवस अगोदर जन्म घेतला होता. हे बाळ जवळपास १८०० फूट उंचीवर जन्माला आले होते. प्रसूती वेदना सुरु होताच एका तासातच बाळ जन्माला आले. त्यामुळे सगळ्या विमानात बाळाचीच चर्चा सुरु होती. विमानातील कर्मचाऱ्यांनी मला आणि माझ्या बाळाला सुखरूप रित्या रुग्णालयात पोहचवले. अशी प्रतिक्रिया क्रिस्टी यांनी दिली आहे. तसेच त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांचे आभार हि मानले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.