हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील बरेच लोक इतरांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने मदत करण्यात व्यस्त आहेत. त्याच वेळी, पुष्कळ लोक असे आहेत जे या महागाईच्या काळात पैसे कमविण्यात व्यस्त आहेत, असेही बरेच लोक आहेत जे पैशाची पर्वा न करता स्वस्तात वस्तू विकण्यात गुंतले आहेत जेणेकरून इतरांना कोणतीही अडचण येऊ नये. कोयंबटूरमध्येही अशीच एक महिला राहते जी गेल्या ३० वर्षांपासून अवघ्या एका रुपयात इडली विकत आहे. लॉकडाऊनमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती वाढत असतानाही, ८५ वर्षांच्या या वृद्ध महिलेने आपल्या इडलीची किंमत वाढविली नाही. कमलाथल नावाची ही वयोवृद्ध महिला आजही आपल्या ग्राहकांना एक रुपयातच इडली देत आहे.
अलांडुरईजवळच हि वृद्ध महिला घराबाहेरच खाण्या-पिण्याचे दुकान चालवते तिच्या इथे सुमारे ३०० लोक दररोज इडली खातात. असेही काही लोक आहेत ज्यांना लॉकडाऊनमुळे घरी जाता आलेले नाही आणि कमलाथल त्यांचीही सेवा करतात. कमलथळ यांचे म्हणणे आहे की उडीद डाळची किंमत १०० ते १५० रुपयांपर्यंत वाढली आहे. मिरचीचा दरही दीडशे रुपयांवरून २०० रुपयांवर गेला आहे, परंतु या सर्वांमध्ये मी माझ्या इडलीच्या किंमतीत वाढ केलेली नाही. ते कसं तरी शिल्लक ठेवतात आणि १ रुपयांना इडली विकतात. इतकेच नाही तर कमलाथल लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळायलाही शिकवते. ती लोकांना इतरांपासून दूर राहण्याची आणि इडली खाण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या जागी बसण्यास सांगते.
त्याच वेळी, हि महिला म्हणाली की असे बरेच लोक आहेत जे भाजीपाला, खाणेपिणे वाहतूक करुन मदत करतात. लोक डाळी, भाज्या आणि तांदूळ देत आहेत, यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. नुकतेच द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महिलेशीही चर्चा केली.यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सोशल मीडियावर एक रुपयामध्ये कमलथळ इडली विकत असल्याची बातमी जोरदार व्हायरल झाली होती. त्याचबरोबर, यावर्षी लॉकडाऊनमध्येही इडलीच्या किंमतीत वाढ न केल्याबद्दल त्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.