प्रतिष्ठीत व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना ब्लॅक मेल करण्याचा काही लोकांचा व्यवसाय : रुपाली चाकणकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रतिष्ठीत व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा काही लोकांचा व्यवसाय असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तृप्ती देसाई यांचे नाव न घेता त्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकरांवरील आरोंपवर बोलताना ही राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करण्याच्या व्यापक कटाचा भाग असल्याचं चाकणकर म्हणाल्या आहेत.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत काल पीडित महिले सोबत पत्रकार परिषद घेतली होती. तसेच विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करावा ही मागणी देखील त्यांनी केली होती. या सगळ्या प्रकरणावर “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना चाकणकर यांनी तृप्ती देसाई यांना चागलेच सुनावले आहे.

चाकणकर म्हणाल्या की “गेल्या वर्षी भोर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्या सगळ्या प्रकरणात मी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी लक्ष घालत पोलीस तक्रार केली लागलीच त्या गुन्हेगाराला अटक झाली.त्याप्रकरणाची आता न्यायालयीन सूनवाई चालली आहे.आता ते प्रकरण पुण्यातलच पण त्यात प्रसिद्धी मिळणार नव्हती. म्हणून या प्रसिद्धीचा सोस असणाऱ्या मॅडम तिकडे फिरकल्या सुद्धा नाहीत पण हे राजेश विटेकर हाय प्रोफाईल प्रकरण आहे.यात आपल्याला प्रसिद्धी मिळेल हे बघून या मॅडम ह्या प्रकरणाला एवढी हवा देत आहेत.बाकी दुसरं काहीच नाही असं म्हणत मी एक महिला म्हणून या प्रकारचा निषेध करते असही चाकणकर म्हणाल्या आहेत.