मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहु शकले नाही. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात खलबतं सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन नावांचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे आला आहे. यामध्ये संग्राम थोपटे आणि महाराष्र्टाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या नावांचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. पण कुठल्या नावावर शिक्कामोर्तब करावा या संदर्भात सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून आलेली आहे.