Paytm ची युजर्सला खास भेट; १ लाखाची खरेदी करा आणि पुढच्या महिण्यात पैसे भरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण पेटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण अलीकडेच कंपनीने आपली पोस्टपेड सेवा (पेटीएम पोस्टपेड सर्व्हिस) वाढविली आहे. आता या सेवेमध्ये आपण आपल्या शेजारच्या जनरल स्टोअर तसेच इतर रिटेल चेन वरून रिलायन्स फ्रेश, हळदीराम, अपोलो फार्मसी, टाटा क्रोमा, शॉपर्स स्टॉप वरून वस्तूंची खरेदीकरून एका महिन्यासाठी पैसे न देण्याची सूट मिळेल. पेटीएम युझर्स त्यांची सर्व प्रकारची बिले भरण्यासाठी तसेच किराणा सामान आणि घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठीदेखील याचा वापर केयू शकतात. याबाबत कंपनीचे असे म्हणणे आहे की, सध्याच्या कोरोना साथीच्या काळात ग्राहकांच्या कर्जाची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता कंपनीने फर्निचर आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स या मोठ्या वस्तूंसाठी मासिक पेमेंट मर्यादा वाढवून एक लाख रुपये इतकी केली आहे.

पेटीएम पोस्टपेडचा फायदा काय ? (What is Paytm Postpaid Service) – यासंदर्भात पेटीएम अधिकारी म्हणाले की,’या सेवेमुळे पेटीएम युझर्सना वाढीव कर्जाची मर्यादा मिळू शकेल. यासाठी दररोजचा खर्च भागविण्यासाठी तुम्हांला पुन्हा पुन्हा पैसे काढण्याची गरज भासणार नाही.

कंपनीने या पोस्टपेडचे ३ प्रकार सादर केले आहेत. यामध्ये लाईट, डिलाईट आणि एलिटचा समावेश आहे. जेथे पोस्टपेड लाईटची सुविधा फीसह २०,००० रुपयांपर्यंत आहे.

त्याच वेळी डिलाईट आणि एलिट डिलाईटचे मासिक क्रेडिट लिमिट २०,००० रुपयांपासून ते १ लाखांपर्यंत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा शुल्क नाही आहे. या पेटीएम पोस्टपेड सेवेचा लाभ घेण्यासाठी फाइनांशियल सर्विसेस सेक्‍शन मध्ये ‘पोस्टपेड’ हा आयकॉन दिसेल. यासाठी पार्टनर असलेल्या एनबीएफसीसह ऑनलाइन केवायसी पूर्ण करावे लागेल. हे पूर्ण झाल्यानंतर आयकॉन दिसेल. या बिलाची प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत परतफेड करण्याची आवश्यकता असेल.

ही सेवा दोन एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्या) च्या पार्टनरशिप मध्ये देण्यात येत आहे. हा पेटीएम अ‍ॅप युझर्सना वेगवेगळ्या देयकासाठी त्वरित कर्जाची सुविधा देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment