जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क विषयी ‘या’ काही विशेष गोष्टी, ज्याबद्दल आपल्याला अद्यापही माहिती नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. गुरुवारी त्यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संस्थापकाकडे आता एकूण 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मस्कच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, त्यांची कंपनी टेस्ला अपेक्षेनुसार कामगिरी करत नव्हती आणि त्याला आपली कंपनी विकायची होती. मात्र, आता त्याच कंपनीमुळे गुरुवारी मस्कने हे स्थान मिळवले आहे. गुरुवारी व्यापारादरम्यान टेस्लाच्या शेअर्समध्ये 8.8 टक्क्यांनी वाढ झाली. चला तर मग एलन मस्कशी संबंधित अशा काही खास गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुम्हाला आजपर्यंत माहित झालेल्या नाहीत.

एलन मस्क त्याच्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध आहे
आपल्या बेधडक ट्वीट बाबत प्रसिध्द असलेले टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी 26 जून 2020 रोजी ट्विट करून अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना एक कॉपीकॅट म्हटले. बेझोसने सेल्फ-ड्रायव्हिंग व्हेईकल स्टार्टअप Zoox विकत घेतल्यानंतर मस्कने जेफ बेझोससाठी हे विधान केले.

कोरोना साथीच्या वेळी चीनी लोकांबाबत असे म्हटले
कोरोना विषाणूच्या आउट ब्रेकनंतर अमेरिका आणि चीनमधील तणाव खूप वाढलेला होता. परंतु, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी चिनी लोकांचे कौतुक केले होते. एका मुलाखतीत ते चीनच्या लोकांबाबत म्हणाले की, ते हुशार आणि मेहनती लोकं आहेत. ‘माझ्या मते चीन आश्चर्यकारक आहे. चिनी लोकांमध्ये खूप ऊर्जा आहे. तिथले बरेच लोक स्मार्ट आणि मेहनती आहेत. तिथली लोकं एंटाइटल्ड नाहीत पण ते कधीही आत्मसंतुष्ट होत नाहीत.

आपल्या मुलाचे खास नाव ठेवले
जगातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिकाने जेव्हा एलन मस्कच्या मुलाचे नाव ऐकले तेव्हा ते गोंधळून गेले. त्याच प्रकारे, हे आश्चर्यचकित करणारे नाही कारण त्यांनी आपल्या मुलाचे नाव X Æ A-12 असे ठेवले आहे. त्याची जोडीदार Grimes बरोबर हे नाव ठेवले. एकदा पत्रकारांनी त्यांना विचारले की, X Æ A-12 कसे आहे. हे ऐकून मस्क गोंधळले. त्यांनी रिपोर्टरला पुन्हा विचारायला सांगितले. यानंतर ते हसले आणि म्हणाले, ‘अरे, याचा अर्थ माझा मुलगा असा आहे तर ? तो पासवर्ड सारखा दिसत आहे.

टॅक्स वाचवण्यासाठी सोडले कॅलिफोर्निया
जर आपल्याला असे वाटत असेल की, केवळ मध्यमवर्गीय लोकंच टॅक्स वाचविण्यासाठी गुंतलेले आहेत तर आपण कदाचित चुकीचे आहात. खरं तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्कसुद्धा कोट्यवधी डॉलर्सचा टॅक्स वाचवण्याच्या तयारीत होते. खरं तर, एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, एलन मस्क हे कथितपणे इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अमेरिकेतील टेक्सासला जाण्यासाठी कॅलिफोर्निया सोडण्याच्या तयारीत आहे.

https://t.co/eDn0QHWpiM?amp=1

लाईव्ह शो मध्ये पिला गांजा
एलन मस्क एकदा कॅलिफोर्नियामध्ये एका कॉमेडियनच्या लाईव्ह शोमध्ये सामील झाले. जिथे त्यांनी गांजाचे काही कश ओढले आणि लाइव्ह शो दरम्यान बिअरही पिली. हा कार्यक्रम इंटरनेटवर बर्‍याच लोकांनी पाहिला.

https://t.co/9KqfbJx5MY?amp=1

बिल गेट्सना समझ नसलेला असे सांगितले म्हंटले होते
टेक्नोलॉजी क्षेत्रातले दिग्गज बिल गेट्स यांनी काही काळापूर्वी टेस्लाच्या इलेक्ट्रिक ट्रकबद्दल सांगितले होते की, ते जास्त प्रवास करण्यास सक्षम नाहीत. काही दिवसांनंतर एलन मस्कने गेट्सना लक्ष्य केले. ट्विटरवरील जेव्हा एका फॉलोअर त्यांना जेव्हा इलेक्ट्रिक ट्रकच्या व्यवहार्यतेबद्दल गेट्सच्या मताबद्दल आपली प्रतिक्रिया विचारली तेव्हा मस्कने त्याला उत्तर दिले की, ‘त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही.’

https://t.co/O5ISa03g8S?amp=1

एलन मस्कने ‘सिग्नल’ अ‍ॅपला पाठिंबा दर्शविला
टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्यानंतर ट्विट केले आणि ‘सिग्नल’ अ‍ॅप वापरण्यास सांगितले. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्सची माहिती मूळ कंपनी फेसबुकसह फॉरवर्ड आणि प्रोसेस करण्यासाठी बदल केले आहेत. त्यानंतर मस्कने सिग्नल अ‍ॅपच्या वापरास पाठिंबा दर्शविला. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गशी जुना सार्वजनिक मतभेद असल्याचा मस्क यांचा इतिहास आहे.

https://t.co/f7wcBX2AAI?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment