कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिमांचे मृतदेह श्रीलंकेत जाळले जातायत, मुस्लिम धार्मिक नेते म्हणाले हे तर इस्लामविरूद्ध..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । श्रीलंकेतील मुस्लिम धार्मिक नेत्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्राण गमावलेल्या मुस्लिमांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.या मुस्लिम धर्मगुरूंचे असे म्हणणे आहे की सुधारित नियम हा इस्लामिक परंपरेच्या विरोधात असून आम्ही सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही आहोत. विशेष म्हणजे, श्रीलंकेने देशातील मुस्लिमांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अंत्यसंस्कारावेळी कोरोनामुळे मृत पावलेल्यांना जाळणे हे सक्तीचे केले आहे.

मुस्लिम धर्मगुरू म्हणाले, ‘आमच्या धार्मिक तत्त्वांच्या विरोधात’
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -१९ मुळे मरण पावलेल्या मुस्लिमांना १८० हून अधिक देशांत दफन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असा दावा ऑल सिलोन जमीअतुल उलेमा (एसीजेयू) ने आरोग्य सेवा महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. “देशाचा कायदा पाळणे आणि त्यासंदर्भात लोकांना मार्गदर्शन करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे,” असेही या पत्रात म्हटले आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही या निर्णयाचे समर्थन करत आहोत किंवा याच्याशी सहमत आहोत कारण ते आमच्या धार्मिक तत्त्वांच्या विरोधात आहे. ‘

Muslims Adapt Funeral Rites in The Age of Corona | Al Bawaba

मुस्लिमांचा विरोध असूनही मृतदेह जाळले जात आहेत
या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की शरीर दफन केल्याने या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. देशात या प्राणघातक संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी किमान ३ मुस्लिम आहेत. मुस्लिम मृतांच्या कुटुंबियांचा निषेध असूनही त्यांचे मृतदेह जाळले जात आहेत. श्रीलंकेत आतापर्यंत कोरोना विषाणूची ८३५ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी ४०४ हे श्रीलंकेचे नौदल कर्मचारी आहेत. गेल्या महिन्यातील २० मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे, परंतु ११ मेपासून ते हटवण्याची सरकारची योजना आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.