“खचून जाऊ नका, तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो” – खासदार श्रीनिवास पाटील

सातारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त भागांची पाहणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

गेल्या चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. दरडी कोसळून माणसे गाडली गेली आहेत. शेती शिवार उभ्या पिकांसह वाहून गेली आहेत. या दरम्यान दिल्लीत अधिवेशनाला उपस्थित असलेले खासदार श्रीनिवास पाटील परत आल्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांनी वाई, देवरूखकरवाडी येथील परिस्थितीची पाहणी केली व तेथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांना धीर दिला. “तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो,” असे म्हणत त्यांनी आश्वासन दिले.

सातारा येथे जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी महाबळेश्वरला जाऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतळी. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मकरंद पाटील, प्रशासकीय अधिकारी उपस्स्थत होते. दरम्यान, मेणवली, अभेपुरी, जांभळी येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीचा तेथील शेतकऱ्यांकडून आढावा घेत कोंढावळे ग्रामस्थांची भेट घेतली. प्रशासकीय अधिकारी, गावकरी, मदत देणारी लोक, संस्था यांना मार्गदर्शन करतात आणि तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो असे म्हणत त्यांनी आश्वासन दिले. तसेच, ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक अतिवृष्टीमुळे दगावले त्यांचे सांत्वन देखील केले.

देवरूखकरवाडी येथील २० घरांवर दरड कोसळली त्यात सहा घरे पूर्ण गाडली गेली. २७ लोक अडकले होते. आमदार मकरंद पाटील यांनी सर्व प्रशासन आणि अनेक कार्यकर्ते घेऊन मदत कार्यात सहभागी होऊन तत्काळ बचावकार्य राबविल्याची माहिती मिळताच खासदार पाटील यांनी आमदार मकरंद पाटील यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर येथील नुकसानीची पाहणी केली. या ठिकाणी अनेक घरात पाणी शिरले, रस्ते दहा दहा फूट खचले आहेत. महाबळेश्वर पोलादपूर पुरता वाहून गेला आहे. घाट रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला आहे.

You might also like