हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशभरातील एकूण स्थलांतराच्या सर्वाधिक स्थलांतर हे उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये होते असल्याचे एका अभ्यासात दिसून आले होते. भारतात आणि जगभरात सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटकाळात सर्व ठिकाणचे स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतण्यासाठी हतबल झाले आहेत. सरकारकडून अपेक्षाभंग होत असल्याने ते आता मिळेल त्या मार्गाने शक्य तितक्या लवकर आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. गाझियाबादमधील श्रमिक रेल्वेच्या बुकींगसाठीची गर्दी, स्थलांतरित कामगारांचे विविध ठिकाणचे फोटो पाहता त्यांच्या अवस्थेचे चित्रण करत आहेत. राज्यातील कामगारांची ही अवस्था पाहता उत्तरप्रदेश सरकारवर लोकांमधून द्वेष व्यक्त केला जात आहे. ट्विटरवर सृष्टी के या तरुणीने आपल्या भावना व्यक्त करीत एक व्हिडीओ केला आहे, ज्यात ती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच प्रश्न विचारते आहे.
https://twitter.com/srishtykInc/status/1262631992543281153?s=08
ती म्हणते आहे, ” जेव्हा लाखो लोकांचे आयुष्य तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असते तेव्हा तुम्हांला खूप सक्षम असल्याचे भासत नाही का? नक्कीच तुम्हाला तुम्ही खूप ताकदवान असल्याचे जाणवत असेल. पण ही भावना इतर लोकांच्या जीवाची किंमत वसूल करून येता कामा नये. आपल्या आजूबाजूचे लोक रोज मरत आहेत. काल गाझियाबाद मध्ये जी गर्दी जमली होती ती कुणाची रॅली किंवा जनसभा नव्हती. आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची ती गर्दी होती ज्यातला एक माणूस म्हणत होता मला मरायचे आहे पण माझ्या जमिनीवर… अशी अनेक बालके आहेत जी मरत आहेत आणि त्यांना मोठे होण्याची संधी मिळणार नाही आहे. भर उन्हात अन्न पाण्याशिवाय लोक हजारो मैल चालत आहेत फक्त आपल्या घरी पोहोचण्यासाठी. लोक मदत करू इच्छितात पण तुम्ही ती मदत लोकांपर्यंत पोहोचू देत नाही आहात” अशा कठोर शब्दात ही तरुणी व्यक्त होते आहे. ज्या प्रदेशात जिवंत आणि मृत लोकांना एकाच ट्रक मध्ये घातले जाते अशा प्रदेशात तुम्हाला फिटनेस प्रमाणपत्र हवे आहे? असा सडेतोड प्रश्न ती विचारते आहे. तुमचा अहंकार इतका मोठा होऊ देऊ नका की लोक मृत्युमुखी पडतील, आपल्या घरी जाण्याची आशा गमावून बसतील असे ही तरुणी या व्हिडिओद्वारे सांगते आहे.
https://twitter.com/srishtykInc/status/1262474849563430914?s=19
देशाच्या कानाकोपऱ्यातून स्थलांतरित कामगार मोठ्या संख्येने उत्तरप्रदेश मध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारची जबाबदारी वाढली आहे.
https://twitter.com/srishtykInc/status/1262700913367699456?s=19