पाण्यामध्ये तरंगणारी बँक ! SBI कशाप्रकारे देत आहे कॅश; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक आता मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरातही लोकांना बँकिंगची सुविधा पुरवित आहे. या कठीण काळात एसबीआय पूरग्रस्त आसाममधील लोकांना मदत करत आहे. एसबीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. एसबीआय म्हणते की, आसाममधील एसबीआय कुटुंबातील सदस्य (आसाम) पूरग्रस्त गावांमधील लोकांना बँकिंग सेवा आणि सपोर्ट करीत आहेत. पाऊस आणि पुरामुळे आसाममध्ये हाहाकार निर्माण झाला आहे. आसाममध्ये आतापर्यंत पावसामुळे 84 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये हे दिसून येते की, एसबीआयचे कर्मचारी बोटीवर बसून पूरग्रस्त गावांमधील लोकांना बँकिंग सेवा देत आहेत. ते खात्यातून पैसे काढून ग्राहकांना देत आहेत.

 

25 लाख लोक पुरामुळे बाधित
आसाममधील पूरामुळे सुमारे अडीच दशलक्ष लोक बाधित झाले आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, पुरामुळे या राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये एकूण 24,19,185 लोक प्रभावित झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आसाममधील पूरस्थिती गंभीर आहे, ब्रह्मपुत्रासह बहुतांश नद्या या धोक्याच्या पातळी वरुन वाहू लागलेल्या आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पूरस्थिती अहवालानुसार 24 जिल्ह्यांमध्ये पूर आलेला आहे 1,09,600.53 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीचा परिणाम एकूण 2,254 खेड्यांवर झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment