Friday, January 27, 2023

राज्य सरकारने केवळ निर्बंध करण्याऐवजी रुग्णालयांवर लक्ष केंद्रित करावे : संजय निरुपम

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला. यातून महाराष्ट्र सावरतों सावरतो तोपर्यंत शुक्रवारी पहाटे मुंबईतील विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी शोक व्यक्त केला. तसेच राज्य सरकारने केवळ निर्बंध करण्याऐवजी रुग्णालयांवर लक्ष केंद्रित करावे, असा ट्विटरच्या माध्यमातून सल्ला दिला.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, विरारच्या एका हॉस्पिटलचा आग लागला आणि 14 जणांना जीव गमवावा लागला. ईश्वर मृतकांच्या आत्म्यास शांती देवो, त्यांच्या प्रति आम्ही शोक व्यक्त करतो. महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये आताच्या काळात रोज आग लालगत आहे. राज्य सरकारने केवळ निर्बंध लावण्या ऐवजी रुग्णालयांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे.

- Advertisement -

मुंबईजवळील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. यांनतर सर्व स्थरातून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. अशा घटना घडू नये यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयात आग लागल्याने हि घटना घडण्यामागचे कारण शोधण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे.