मुंबई प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाकाच देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. आज पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिकेच्या आणि महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल असे जाहीर केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणारे कर्मचारी वगळता या आधी महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपचा हतकांडा असणारा शहरी मतदार काबीज करण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. त्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना फडणवीसांनी गिफ्ट दिले आहे. त्याचा निश्चितच त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे.
महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २ सप्टेंबरपासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे असा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.