हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचे प्रमाण थांबले आहे. राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. मात्र केंद्राकडून 35 हजारच रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
उध्दव ठाकरे म्हणाले, देशात कोरोनासाठी इंजेक्शन देण्यात येत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात केंद्राने 26 हजार 800 मिळतील, अशी व्यवस्था केली होती. परंतु मी पंतप्रधान यांना विनंती केली होती. त्यानुसार पंतप्रधानांनी विनंती मान्य करून 43 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची सोय केली. आज राज्याला दररोज 35 हजार इंजेक्शन मिळतात.
केंद्राकडून राज्याला मिळणारी इंजेक्शन ही पैसे देवून घेत आहोत. तेव्हा कोव्हीड रूग्णालयात काम करणाऱ्या डाॅक्टर तसेच नातेवाईकांनी रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापरू नका. गरजेप्रमाणे त्यांचा वापर करावा. इंजेक्शनचा अतिरिक्त वापरू नका, आपल्याकडे इंजेक्शनचा तुटवडा नाही. परंतु अनावश्यक वापर केल्यास त्यांचे साईड इफेक्टस होवू शकतात, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.