सीबीआयच्या समन्सबाबत अनिल परबांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी सीबीआयकडून राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सीबीआयचे समन्स देण्यात आले असल्याने याबाबत अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “मला असे कोणतेही समन्स आलेले नाही. समन्स आलेलंच नाही तर वेळ कशासाठी मागायचा, असा प्रश्न परब यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

परिवहनमंत्री अनिल पेब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री परब यांनी त्यांना सीबीआयमार्फत देण्यात आलेल्या समन्सबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मला सीबीआयने कोणत्याही स्वरूपाचे समन्स दिलेले नाही. तरीही माझ्याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे या खोट्या माहितीवर विश्वास ठेऊ नये.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप कऱण्यात आला होता. मनी लॉड्रिंगबाबत सध्या ईडीकडून तपास सुरु आहे. चांदिवाल आयोगाससोरही सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यापूर्वी माजी मुख्य सचिव सिताराम कुंटेंचीही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात चौकशीसाठी डीजीपींना सीबीआयचे समन्स पाठवण्यात आले होते. अखेर डीजीपींचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी आपल्याला सीबीआयचे कोणतंही समन्स आलेले नसल्याचे म्हंटले आहे.

Leave a Comment