हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंद करत अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पक्ष काहीसा कमकुवत झाल्याचे दिसत आहे. ही कमकुवत भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आगामी निवडणुकांसाठी शरद पवार (Sharad Pawar) राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन सभा बैठका घेत आहेत. या सभांना देखील जनतेकडून तितकाच प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाकडून शिर्डी येथे राज्यव्यापी कार्यकर्ता शिबिर घेण्यात येणार आहे.
आगामी निवडणुकांसाठी पक्षाची संघटन बांधणी करण्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे शरद पवार गटाकडून राज्यव्यापी कार्यकर्ता शिबिर येत्या ऑक्टोंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. नुकतीच राष्ट्रवादीत पडलेल्या फुटी नंतर जिल्हा पातळीवर पहिलीच बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत दिलेल्या कार्यकारणीतील 90 पैकी 60 सदस्य उपस्थित होते. त्यावेळी गैरहजर पद अधिकाऱ्यांच्या जागी आम्ही नवीन नियुक्ती करण्याचा विचार करत असल्याची माहिती राजेंद्र फाळके यांनी दिली.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील अनेक महत्त्वाचे आमदार देखील भाजपमध्ये गेल्यामुळे पक्षाला गळती लागली आहे. आमदारांच्या जाण्याचा तोटा राष्ट्रवादीला आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो. त्यामुळेच पक्षाने संघटन बांधणीवर जास्त जोर दिला आहे. एकीकडे शरद पवार यांच्या सभा सुरू असताना दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादीकडून शिबिरे आयोजित केली जात आहेत. आता ऑक्टोंबर महिन्यात शिर्डी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता शिबिर पार पडू शकते.