औरंगाबाद : ना ओटीपी सांगितली , ना पासवर्ड तरीही सायबर भामट्यानि सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या क्रेडिट कार्ड मधून रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी जळबाजी सोनटक्के यांनी दिलेली फिर्याद अशी की, 14 मे 2021 रोजी त्यांच्या मोबाईलवर आर.बी. एल.बँकेकडून हफ्ते पाडण्यासाठी एस.एम.एस.आला. सोनटक्के यांनी कोणतेही कर्ज घेतले नाही. कुणाला ओटीपी सांगितला नाही. किंवा क्रेडिटकार्ड चा पासवर्ड देखील सांगितलेला नाही. खरेदी केली नाही मग मेसेज कसा आला? या बाबत संशय आल्याने त्यांनी कस्टमरकेअर क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यावेळी दि. 07 मे 2021 रोजी त्यांच्या क्रेडिटकार्ड खात्यातून 30 हजार 975 रुपयांचे पॉलिसी ट्रांझक्षणं झाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्यातक्रारीची नोंद करून 45 दिवसात पैशे परत होतील असे आश्वासन दिले होते. मात्र पैसे काही परत आले नाही. या उलट त्या रकमेवर 10 हजार 313 रुपयांचा व्याज लावण्यात आला. अजूनही तो व्याज वाढतच चालला आहे. फसवणूक झालेली रक्कम परत मिळत नाही आणि व्याज वाढत चालला असल्याने अखेर सोमवारी सोनटक्के यांनी तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.