नवी दिल्ली । मजबूत जागतिक सिग्नल (Global market) दरम्यान आज शेअर बाजाराने (Stock Market) चांगली सुरुवात केली आहे. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 283.52 अंक म्हणजेच 0.56 टक्क्यांच्या तेजीसह 50,678.60 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. या व्यतिरिक्त निफ्टी निर्देशांक (Nifty Index) 64.85 अंकांच्या म्हणजेच 0.43 टक्क्यांच्या बळावर 14,994.35 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर खरेदी आज बाजारात पाहायला मिळत आहे.
जागतिक बाजारपेठेतून चिन्हे चांगली मिळू लागली आहेत. अमेरिकेत DOW आणि S&P 500 चे रेकॉर्ड क्लोजिंग झाले आहेत. याखेरीज आशियाई बाजारांत जोरदार सुरुवात झाली. SGX NIFTY मध्ये चतुर्थांश टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
सेक्टरल इंडेक्स
सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकल्यास आज बीएसई मेटल्समध्ये विक्री बघायला मिळत आहे. या व्यतिरिक्त सर्वच क्षेत्रांमध्ये आज ग्रीन मार्कवर ट्रेड झाला आहे. बीएसई ऑटो, बँक निफ्टी, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्यूरेबल्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, आयटी, ऑईल अँड गॅस, पीएसयू, टेक या सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी झाली आहेत.
स्मॉलकॅप-मिडकॅप इंडेक्स
बीएसई स्मॉलकॅप-मिडकॅप आणि सीएनएक्स मिडकॅप इंडेक्समध्येही चांगली खरेदी बघायला मिळते आहेत. स्मॉलकॅप इंडेक्स 128.53 अंकांच्या वाढीसह 21224.32 च्या पातळीवर ट्रेड करीत आहे. मिड कॅप इंडेक्स 105.43 अंकांच्या वाढीसह 10534.54 वर आहे. त्याचबरोबर सीएनएक्स मिडकॅप 91.60 अंकांच्या वाढीसह ट्रेड करीत आहे.
8 शेअर्स घसरत आहेत
बीएसईच्या पहिल्या 30 शेअर्स पैकी 8 शेअर्स विकले जात आहेत. याशिवाय सर्वांमध्ये चांगली खरेदीही पाहायला मिळत आहे. SBI, Bajaj Auto, NTPC, Axis Bank, Icici Bank, Reliance, HDFC आणि सन फार्मा या कंपन्यांचा टॉप लूजर्सच्या लिस्टमध्ये समावेश झालेला आहे.
तेजी असलेले शेअर्स
तेजी असलेल्या शेअर्स विषयी बोलायचे झाल्यास, आज एशियन पेंट्स टॉप गेनर्सच्या लिस्टमध्ये समावेश आहे. याशिवाय टायटन, Dr Reddy, भारती एयरटेल, TCS, HCL Tech, TechM, ONGC, Infosys, ITC, Maruti, Kotak Bank, Bajaj Fin आणि नेस्ले यांची चांगली वाढ दिसून येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.