मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत असताना लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच काळात राज्य सरकारने लॉकडाऊनची तयारी सुद्धा केली आहे. नवीन नियमानुसार आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून कडक निर्बंध लागू होणार आहेत. काय आहे ही नियमावली याबाबत जाणून घेऊ.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. यानुसार आज नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
🚨New strict restrictions under #BreakTheChain🚨
To be implemented from 22nd April 2021, 8pm onwards pic.twitter.com/ifyrcQCbnH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021
अशी आहे नवीन नियमावली:
किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी,मटण, चिकन, मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने, पशूखाद्य विक्री, बेकरी व मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने तसेच, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही सर्व अत्यावश्यक दुकाने आणि विक्री ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहतील.
अशी आहे नवीन नियमावली (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत)
१) किराणा दुकाने – सकाळी 7 ते 11
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री – सकाळी 7 ते 11
३) भाजीपाला विक्री – सकाळी 7 ते 11
4) फळे विक्री – सकाळी 7 ते 11
5)अंडी, मटण, चिकन, मासे विक्री – सकाळी 7 ते 11
6) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने – सकाळी 7 ते 11
7) पशूखाद्य विक्री – सकाळी 7 ते 11
8) बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने – सकाळी 7 ते 11
9) पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने – सकाळी 7 ते 11
ब्रेक दि चेनची अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे असतील –
- लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड
- लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॉलमध्ये 2 तास कार्यक्रम
- आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी
- मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने
- सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरु
- खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु
- लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश. आयकार्ड तपासून तिकिट मिळेल
- खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच