बनवडीतील अभिजीत मदने यूक्रेनहून परतला मायदेशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

युक्रेनमध्ये भारतातील विध्यार्थी अडकल्याने त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा राबविले. त्याच्या माध्यातून आज मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्याना मायभूमीत परत आणण्यात आले आहे. भारतात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी येथील अभिजित मदने याचाही समावेश होता. अभिजीत मदने हा युक्रेन येथे शिक्षणासाठी होता. तोही नुकताच युक्रेनहून मायदेशी परतला आहे.

आपल्या मायभूमीत अभिजित परतल्यानंतर त्याचे येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अभिजित याने त्याला युक्रेनमध्ये अडकल्यावर आलेले अनुभव सांगितले.

यावेळी अभिजित म्हणाला की, सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. अशा अवस्थेत केंद्र सरकारने भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 2017 रोजी मी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलो होतो. पाच वर्षात शिक्षण सुरळीत सुरु होते. पाच वर्ष तेथील परिस्थिती पूर्णपणे नॉर्मल होती.

मात्र, नोव्हेंबर पासून रशियन सैनिकांनी आपले सैन्य युक्रेनमध्ये बॉर्डरवर आणण्यास सुरुवात केली. कालांतराने काही दिवसापूर्वी युक्रेमधून सांगितले गेले की येथील भयानक परिस्थिती होत चालली आहे. लोकही आपले कुटूंब सोबत घेऊन घरातील तळघरात जाऊन राहू लागले. आम्हालाही जाणवले कि आता आमचाही जीव धोक्यात आहे. आम्ही तत्काळ त्या ठिकाणाहून भारतात परतलो. आम्हाला या ठिकाणी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या ऑपरेशन गंगाची मोठी मदत झाली. मी त्याबद्दल मोदी सरकारचे विशेष आभार मानेल. त्यांच्या अशा प्रकारच्या मोहिमेमुळे आज असंख्य विध्यार्थी मायदेशी सुखरूप परतले आहेत.

यावेळी अभिजित मदने यांच्या वडील व आईनेही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनीहि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment