चंद्रपूर प्रतिनिधी |काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने प्राचार्य गुरुराज कुलकर्णी, सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांनी आपल्याकडे शारीरिक संभोगाची मागणी केल्याचा आरोप ठेवला आहे.
राजुरा वसतिगृह येथील लैंगिक शोषण प्रकरण आणि आदिवासी मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुभाष धोटे चांगलेच वादात अडकले आहेत. राजुरा येथील कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनीने प्राचार्य गुरुराज कुलकर्णी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. मात्र संस्थाचालक असलेल्या सुभाष धोटे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित विद्यार्थिनीवर जबरदस्तीचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात विद्यार्थिनीने दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी देखील दबाव टाकण्यात आला होता. तसेच पीडिताला व भावाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, अशी तक्रार संबंधित विद्यार्थिनीने दिली होती. या प्रकरणानंतर सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
याप्रकरणी काल गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना आज अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सुभाष आणि अरुण धोटे यांना बल्लारपूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. याआधी राजुरा येथील शाळेत आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात असंवेदनशील वक्तव्य केल्याने सुभाष धोटेंवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ते जामीनावर आहेत.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?
धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून
कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून
Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र
निकालानंतर मोदी नव्हे तर दुसऱ्याच भाजप नेत्याला मिळू शकते पंतप्रधान होण्याची संधी
मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?
सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल