अखेर फिरोदिया करंडक साठी विषय निवडीचे निर्बंध मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र| विविध एकांकिकांसह अनेक कलांसाठी घेण्यात येणारी फिरोदिया ही स्पर्धा एक फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कला क्षेत्रात काम करणारे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अधिक महत्वाची मानली जाणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धे कडे बघण्यात येते. या स्पर्धेत कलाकार विविध नाविन्यपूर्ण विषय तसेच समाजातील परिस्थितीवर भाष्य करणारे विषय मांडत असतात. परंतु यंदा या स्पर्धेतील विषयांच्या सादरीकरणाबाबत काही बंधने घालण्यात आली होती. परंतु समाजातील विरोधानंतर हि बंधने मागे घेण्यात आली आहेत

या स्पर्धेच्या आयोजकांकडून जात, धर्म व्यवस्था, काश्मीर ३७०, भारत-पाक, हिंदू-मुस्लीम, राम मंदिर-बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते.  परंतु हे निर्बंध घातल्याचे समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. ही बंधने घालण्यात आल्यामुळे समाजातील विविध स्तरांमधून टीकेची झोड उठली होती. या टीकेची दाखल घेत आयोजकांनी हे निर्बंध मागे घेतले आहेत.

Firodiya-Leeter-1.jpg

स्पर्धेसाठी घालण्यात आलेली बंधने मागे घेतल्याचे एक पत्रक आयोजकांमार्फत जरी करण्यात आले आहे. ‘कोणत्याही विषयांवर सादरीकरण करायचे असेल तेव्हा प्रयोग सादर करण्याआधी संघांनी नाटकासाठीच्या सेन्सॉर मंडळाची परवानगी घेणं गरजेचं असल्याचं या पत्रकामध्ये सांगितलं आहे. त्यानंतरच नाटक सादर करण्यासाठी परवानगी दिली जाणार असून,  याबाबतची कोणतीही जबाबदारी संयोजक घेणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.