“राज्यसभेच्या सदस्याची उंची कशी नसावी याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राऊत”; मुनगंटीवारांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपा नेत्यांना जाहीर इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला असून राऊतांवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील जनता राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती नाहीत. ज्या पद्धतीने ते भाष्य करतात त्यामुळे ते राज्यसभेचा गौरव वाढवत नाहीत. राज्यसभेच्या सदस्याची उंची कशी नसावी याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राऊत यांनी म्हंटले आहे की, “आम्ही जेलमध्ये गेल्यास तुम्हालाही टाकू” राऊत यांनी म्हंटलेले हे वाक्यच घटनेच्या चौकटीत गांभीर्याने घेतले पाहिजे. याचा अर्थ आम्ही चुका करतो, तुम्ही दुर्लक्ष करा आम्ही करतो, असा होतो.

देशाच्या स्वातंत्र्याचा मंगलकलश हा गुंडाराजसाठी दिला आहे का? उद्या कोणीही कोणत्या पक्षाचा चुकत असेल तर आमची चौकशी थांबवा आम्ही तुमची करणार नाही ही वाटाघाडी जनतेला कशी पटेल? एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का?,” असा उलट सवाल यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांना केला आहे.

शिवसेनेचा जो दबदबा आता राहिलेला नाही – मुनगंटीवार

यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले की, शिवसेनेचा जो यापूर्वी दबदबा होता, तो आता राहिलेला नाही. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण म्हणणारी शिवेसना आता 100 टक्के राजकारणात गेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यासाठीची ही पत्रकार परिषद होती,” असंही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

Leave a Comment