साखर कारखान्याच्या अध्यक्षाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर | करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली‌ आहे. या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे.

करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे सहा कोटी रुपयांची एफ आर पी ची रक्कम थकीत आहे. थकीत रक्कम द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विजय रणदिवे हे आपल्या कार्यकर्त्यांचा आज कारखान्यावर गेले होते यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी विजय रणदिवे यांना मारहाण केली आहे.

https://youtu.be/H34vOReyK3Q

या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.