अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात
नगर मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. शिवसेनेचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर त्यांचे जावई राष्ट्रवादीतून लोकसभेला उभे असल्याने काहींनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यापार्श्वभुमीवर आज सुजय विखे यांनी कर्डीले यांच्या घरी जाऊन त्यांची जाहिर माफी मागितली.
राहुरीचे शिवसेना आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाजप-सेना युतीच्या मेळाव्यामध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याचे पडसाद उमटत कर्डिले समर्थक आणि नगर तालुका भाजपच्या वतीने थेट सुजय विखे यांना आव्हान देत जर हा वाद मिटला नाही तर आम्ही शिवसेनेला सोबत न घेता प्रचार करू असा पवित्रा घेतल्याने राजकिय वातावरण तापले होते.
दरम्यान, आज सुजय विखे यांनी आमदार कर्डिले यांच्या घरी जाऊन आणि त्यांच्याबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून जाहीर माफी मागत या वादावर पडदा टाकला आहे. जर भविष्यात अशी घटना घडली तर आपण त्या स्टेजवरून उतरून जाऊ असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा
नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..
अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर
नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”
राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा
या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट
मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर