हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Samriddhi Yojana : आपल्या मुलींना चांगले शिक्षण देणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. यासाठी शासनाकडून सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना गुंतवणुकीचे एक साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे जाणून घ्या कि, या योजनेंतगर्त अवघ्या 2 दिवसांत सुमारे 11 लाख खाती उघडण्यात आली आहे. यावरून ही योजना किती लोकप्रिय आहे याचा अंदाज येऊ शकेल.
या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्विट करत पोस्ट ऑफिसचे अभिनंदन करण्यात आले आहे. 2015 मध्ये सर्वप्रथम Sukanya Samriddhi Yojana सुरु करण्यात आली होती. ज्याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 3 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. यावर चांगला व्याजदर आणि कर सवलत मिळत असल्याने ही योजना प्रत्येक वर्गामध्ये पसंतीस उतरली आहे.
अवघ्या 2 दिवसांत उघडली विक्रमी 11 लाख खाती
Sukanya Samriddhi Yojana अंतर्गत अवघ्या 2 दिवसांत 10.90 लाख खाती उघडल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याकडून भारतीय पोस्ट ऑफिसचे अभिनंदन केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले कि, “या महान कामगिरीबद्दल @IndiaPostOffice चे खूप खूप अभिनंदन! हा प्रयत्न देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित करेल आणि त्यांना आणखी सक्षम बनवेल.””
मोदी सरकारने 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. एका रिपोर्टनुसार, या योजनेमध्ये दरवर्षी जवळपास 33 लाख खाती उघडली जातात आणि आतापर्यंत यामध्ये सुमारे 3 कोटी खाती उघडली गेली आहेत. मात्र, अवघ्या 2 दिवसांत 11 लाख खाती उघडणे ही मोठी बाब आहे.
रेकॉर्ड आहे.
जाणून घ्या या योजनेचे फायदे
सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा पैसे जमा करण्याची सक्ती नाही. यामध्ये आर्थिक वर्षात एकरकमी रक्कमही जमा करू शकता. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा कोणतेही बँक खाते उघडता येते. Sukanya Samriddhi Yojana मध्ये गुंतवणूक करून आपल्या मुलीच्या भविष्यासाठी मोठा फंड जमा करता येतो. या योजनेचा कालावधी 21 वर्षे आहे. तसेच यामध्ये 14 वर्षे पैसे जमा करून 21 व्या वर्षी संपूर्ण रक्कम व्याजासहीत दिली जाईल. या योजनेद्वारे दरवर्षी मोठी रक्कम मिळवता येईल.
समजा, यामध्ये आपल्या 2 वर्षाच्या खाते उघडले. तसेच दरमहा सुमारे 4100 रुपये आणि एका वर्षात 50 हजार रुपये जमा केले तर पुढील 14 वर्षांत एकूण 7 लाख रुपये जमा होतील. यावर सध्या 7.6 टक्के व्याजदर दिला जात आहे. ज्यानुसार 21 व्या वर्षी खाते मॅच्युर झाल्यानंतर आपल्या मुलीला एकूण 23,41,073 रुपये मिळतील. म्हणजे या योजनेत 16 लाखांपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. Sukanya Samriddhi Yojana
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89
हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा
Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 5 वर्षांत दिला जबरदस्त रिटर्न, गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स